रेशन कार्ड यादी ऑनलाईन कशी तपासायची?
तुमच्या गावातील किंवा शहराची नवीन यादी पाहण्यासाठी खालील पावले उचला:
-
अधिकृत वेबसाईटला भेट द्या: प्रथम mahafood.gov.in किंवा थेट RCMS (Ration Card Management System) पोर्टलवर जा.
-
Ration Card पर्याय निवडा: मुख्य पानावर ‘Ration Card’ हा विभाग शोधा आणि त्यातील ‘DFSO wise Unit wise RC count’ या पर्यायावर क्लिक करा.
-
कॅप्चा कोड भरा: स्क्रीनवर दिसणारा सिक्युरिटी कोड (Captcha) टाकून ‘Verify’ करा.
-
तपशील निवडा: आता तुमचे राज्य (Maharashtra), जिल्हा, तालुका आणि रेशन दुकान (FPS) निवडा.
-
यादी पहा: ‘View Report’ वर क्लिक केल्यानंतर तुमच्या भागातील सर्व रेशन कार्ड धारकांची यादी दिसेल. यामध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.