भटक्या कुत्र्यानं व्यक्तीचा अक्षरशः हात फाडला, ओरबाडलं; तो ओरडत राहीला पण… धक्कादायक VIDEO व्हायरल

Dog attacks man पुण्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढत असून, हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एका व्यक्तीवर भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून कुत्र्यांची वाढती दहशत स्पष्ट होते.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक

 

व्हिडिओमध्ये दिसतंय की, पुण्यातील एका पेट्रोल पंपावर एका भटक्या कुत्र्याने एका व्यक्तीवर क्रूर हल्ला केला. कुत्र्याने अक्षरशः त्या व्यक्तीचा हात फाडला आणि तो काही केल्या हात सोडायला तयार नव्हता. आसपासचे लोक मदतीसाठी धावले, पण कुत्रा इतका हिंस्र होता की तो त्या व्यक्तीला वारंवार चावत होता आणि त्याला खाली पाडून फरफटत नेत होता. कुत्र्याने त्याचे डोके, हात आणि पाय यांवर मिळेल तिथे चावे घेतले, जणू काही तो माणूस खेळणं असावा. जखमी अवस्थेत तो व्यक्ती जीवाच्या आकांताने ओरडत होता.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक

 

गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी पुण्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गाडीवरून जाणाऱ्यांचा पाठलाग करण्यापासून ते रस्त्यावर एकट्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना लक्ष्य करण्यापर्यंत त्यांचे हल्ले वाढले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

केवळ महाराष्ट्रच नाही, तर बिहार, उत्तर प्रदेश आणि गुजरातसारख्या इतर राज्यांमध्येही भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे. या हल्ल्यांमध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण बळी पडले आहेत. पायी चालणाऱ्यांना किंवा सायकलस्वारांना ही कुत्री आपले लक्ष्य बनवत आहेत.

Leave a Comment