Rat is playing hide and seek with death he climbed onto the snakes head तुम्ही सोशल मीडियावर सापांनी प्राण्यांना गिळंकृत करतानाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. साप किंवा नाग बेडूक आणि उंदीर यांची सहज शिकार करतात. सापांच्या शिकारीचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. मात्र, सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत. यात, एका उंदराने नागाच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी एक अनोखी युक्ती वापरली आहे, जी पाहिल्यानंतर तुम्हाला उंदराच्या बुद्धीची दाद द्यावी लागेल.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मृत्यूशी लपंडाव खेळणारा उंदीर
जेव्हा मृत्यू समोर उभा असतो, तेव्हा प्रत्येकाला आयुष्याची खरी किंमत कळते आणि त्यातून सुटका मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू असतो. अशाच प्रकारे, एका उंदरासमोर जेव्हा त्याचा मृत्यू सापाच्या रूपात उभा ठाकतो, तेव्हा तो उंदीर आपला जीव वाचवण्यासाठी मृत्यूशी लपंडाव खेळत असल्याचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नागाच्या फण्यावर बसलेला उंदीर
साधारणपणे, साप किंवा नाग उंदराला पकडून लगेचच त्याची शिकार करतात. पण कधीकधी निसर्गात असे चमत्कार पाहायला मिळतात जे पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात. जर उंदीर साप किंवा नागासमोर आला, तर ते त्याला लगेच खाऊन टाकतात. पण यावेळेस कथा पूर्णपणे वेगळी आहे. आपला जीव वाचवण्यासाठी, उंदीर थेट नागाच्या फण्यावर चढतो, जेणेकरून तो त्याला दिसू नये. हे दृश्य पाहून लोक थक्क झाले आहेत.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
उंदराची अनोखी शक्कल
उंदीर त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूच्या, म्हणजेच नागाच्या डोक्यावर बसला आहे. नाग आपला फणा काढून उभा आहे आणि उंदीर मात्र त्याच्या डोक्यावर बसून आहे. नागाच्या तावडीतून सुटका मिळवण्यासाठी, उंदीर कधी डोक्यावरून खाली जात आहे, तर कधी वर येत आहे. नागाला उंदीर दिसत नसल्याने, तो त्याला शोधत आहे. नागाबरोबर हटके पद्धतीने लपंडाव खेळत हा उंदीर आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ पाहताना काळजाचा थरकाप उडतो, पण उंदराची ही हुशारी पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.